IND vs AUS 2nd Test Toss : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (६ डिसेंबर) शुक्रवारपासून सुरू झाली आहे. ही डे नाईट टेस्ट आहे. ॲडलेड ओव्हलवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
या सामन्यात रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. नाणेफेकीदरम्यान त्याने मधल्या फळीत फलंदाजी करणार असल्याचे सांगितले. सोबतच तो मधल्या फळीत करणार असल्याचे सांगितले.
म्हणजे फक्तकेएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला दिसणार आहेत. त्याचबरोबर शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विनचेही पुनरागमन झाले आहे. देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाहेर ठेवण्यात आले आहे.
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने सामना सोपा नसेल. या चेंडूवर फलंदाजी करणे नेहमीच आव्हानात्मक असते, विशेषत: सूर्यास्तानंतर.
२०२० मध्ये टीम इंडिया डे-नाईट कसोटीत दुसऱ्या डावात ३६ धावांवर ऑलआऊट झाली होता.
पण रोहितने काल झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते, गुलाबी कुकाबुरा चेंडूला सामोरे जाण्यासाठी आम्हाला स्वतःचे मार्ग शोधावे लागतील. रोहित म्हणाला, इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या चेंडूच्या वेगाची सवय करून घेण्याची गरज आहे. या चेंडूचा सामना करणे हे आव्हान असेल, असेही रोहितने मान्य केले. रोहित म्हणाला, या मैदानावर खेळले जाणारे गुलाबी चेंडूचे सामने पाहून येथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
संबंधित बातम्या