IND vs AUS 1st ODI : कोहली नाही तर स्टार्कलाही खेळवणार नाही, ऑस्ट्रेलियाने दिली दोन दिग्गजांना विश्रांती
ind vs aus odi playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २१ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांना पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळालेले नाही. कर्णधार पॅट कमिन्स सर्व सामने खेळताना दिसणार आहे.
india vs australlia playing 11 : क्रिकेट विश्वचषक २०२३ पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहेत. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांसाठी ही मालिका सरावासारखी असेल. या मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते नंबर वनवर पोहोचतील. या मालिकेतील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मात्र, मोहाली येथे होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यासाठी मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांना ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळालेले नाही. दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय मॅनेजमेंटनेदेखील पहिल्या दोन वनडेसाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे,
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि स्वतः कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीनंतर भारतीय दौऱ्यावर परतत आहेत. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही या तिघांचा समावेश नव्हता. अॅशेसमध्ये झालेल्या पाठीच्या दुखापतीतून स्टार्क सावरत आहे. तर मॅक्सवेलने घोट्याच्या दुखण्यामुळे दक्षिण आफ्रिका दौरा लवकर सोडला होता. आता तो शुक्रवारी संघात सामील होणार आहे. मनगटाच्या दुखापतीतून सावरलेल्या कमिन्सला तिन्ही सामने खेळण्याची अपेक्षा आहे, तर स्टीव्ह स्मिथही अॅशेसनंतर मनगटाच्या समस्येशी झुंज देऊन पुनरागमन करेल.
पत्रकार परिषदेत कमिन्स म्हणाला, 'आम्ही या परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी करत आहोत. वर्ल्डकपआधी आम्ही काही वेगळे संघ संयोजन वापरून पाहू. काही वेगळ्या खेळाडूंना संधी मिळेल, विश्वचषकात कसे खेळायचे आहे, याचीही रचना आम्हाला तयार करायची आहे".
पहिल्या सामन्यात मॅक्सवेल आणि स्टार्क न खेळल्यामुळे केएल राहुलने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या मालिकेतील पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी राहुलला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोनी , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा