मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AFG : अखेरच्या षटकांमध्ये अफगाणिस्तानने दाखवल दम, भारतासमोर १५९ धावांचे लक्ष्य

IND vs AFG : अखेरच्या षटकांमध्ये अफगाणिस्तानने दाखवल दम, भारतासमोर १५९ धावांचे लक्ष्य

Jan 11, 2024 08:37 PM IST

IND vs AFG t20 Scorecard : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना आज मोहालीत खेळला जात आहे.

IND vs AFG t20 Scorecard
IND vs AFG t20 Scorecard (AFP)

India vs Afghanistan 1st T20 Scorecard : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

यानंतर अफगाणिस्तान प्रथम फलंदाजी करताना ५ बाद  १५८ धावा केल्या. आता भारतला विजयासाठी १५९ धावा करायच्या आहेत.

अफगाणिस्तान संघाकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर अजमतुल्ला उमरझाईने २९ धावा केल्या. या सामन्यात नबी आणि ओमरझाई यांनी चौथ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ६८ धावांची भागीदारी केली. 

ट्रेंडिंग न्यूज

या दोन फलंदाजांशिवाय गुरबाजने २३ आणि कर्णधार झाद्रानने २९ धावा केल्या. नजीबुल्लाह झादरानने अखेरीस ११ चेंडूत १९ धावांची इनिंग खेळली.

भारताकडून अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी २-२ विकेट घेतल्या. शिवम दुबेने एक विकेट मिळविला.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

WhatsApp channel