india vs afganistan 2nd t20 playing 11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. आता मालिकेतील दुसरा सामना (१४ जानेवारी) इंदूर येथे खेळला जाणार आहे.
इंदूर टी-20 सामन्यात विराट कोहलीचे पुनरागमन होणार आहे. विराट १४ महिन्यानंतर टी-20 सामना खेळताना दिसणार आहे. यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होणार हे निश्चित आहे.
विशेष म्हणजे, जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्वाची मानली जात आहे. तसेच, युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्ण संधी आहे.
विकेटकीपरमध्ये जितेश शर्माने आता ईशान किशनला मागे टाकले आहे. त्याने खालच्या फळीत काही उपयुक्त खेळी खेळल्या आहेत.
तिलक वर्मा याच्या बाबतीतही असेच आहे. त्याने गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत ३९, ५१ आणि नाबाद ४९ धावा करून चांगली सुरुवात केली होती पण त्यानंतर पुढच्या १३ डावांमध्ये त्याला केवळ १अर्धशतक झळकावता आले.
पण तिलक ज्या क्रमांकावर खेळतो, त्यासाठी हे आकडे पुरेसे नसून त्याला मोठी खेळी खेळण्याची गरज आहे. दुखापतीमुळे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळू न शकलेला अक्षर आता मर्यादित षटकांमध्येच नव्हे तर कसोटी सामन्यांमध्येही खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
मोहालीत अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने २३ धावांत दोन विकेट घेतल्या. पुढील सामन्यातही आपली चांगली कामगिरी कायम ठेवण्यासाठी तो कोणतीही कसर सोडणार नाही.
या सामन्यात विराट कोहलीही प्लेइंग इलेव्हनमध्ये परतणार आहे. अशा स्थितीत तिलक वर्मा किंवा शुभमन गिल बाहेर पडणार हे निश्चित दिसते. यासोबतच यशस्वी तंदुरुस्त झाल्यास प्लेइंग इलेव्हनमध्येही पुनरागमन करू शकतो. शुभमन गिलच्या जागी त्याला संधी मिळू शकते. गिल अद्याप आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये छाप सोडू शकलेला नाही.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
संबंधित बातम्या