India vs Australia Dubai Stadium Pitch Reprot : चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सेमीफायनल आज (४ मार्च) खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होईल.
मात्र, आज दुबईची खेळपट्टी कशी असेल? फलंदाज सहज धावा करतील की गोलंदाजांना मदत मिळेल? तसेच भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळवला जाईल? असे प्रश्न चाहत्यांच्या मनात पडले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल नवीन खेळपट्टीवर खेळवली जाईल. मैदान तेच असेल पण सामना नव्या खेळपट्टीवर खेळवला जाईल.
अशा स्थितीत ही खेळपट्टी बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्याप्रमाणे असणार नाही. या खेळपट्टीच्या स्वरुपात बदल होणार आहे. त्याच वेळी, आयसीसीच्या देखरेखीखाली, अमिराती क्रिकेट बोर्डाने नवीन खेळपट्टी तयार केली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू सँडरी हा क्युरेटरच्या भूमिकेत आहे.
वास्तविक टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध ४ फिरकीपटूंसह उतरली होती. त्या सामन्यात वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती प्लेइंग इलेव्हनचा भाग होते. नवीन खेळपट्टी असेल तर फिरकीपटूंना चेंडू फिरवणे सोपे जाणार नाही.
अशा स्थितीत भारतीय संघासाठी हा मोठा धक्का मानला जाईल, कारण फिरकी गोलंदाजी ही भारतीय संघाची मजबूत बाजू राहिली आहे. याआधी वरुण चक्रवर्तीने न्यूझीलंडविरुद्ध ५ बळी घेतले होते. खेळपट्टीच्या स्वरुपात बदल झाल्यास वरुण चक्रवर्तीसह अन्य भारतीय फिरकीपटूंच्या अडचणी वाढतील.
संबंधित बातम्या