भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. यानंत दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळला जाणार आहे.
या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. पण या आठवड्याच्या अखेरीस या टी-20 मालिकेसाठी संघ निवडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत कसोटी मालिकेत खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. यात यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह, सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे.
वास्तविक, बांगलादेश टी-20 मालिकेनंतर लगेचच भारताला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे या खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संघात संधी मिळू शकते. या मालिकेत ऋतुराज गायकवाड पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे. याशिवाय रियान पराग आणि हर्षित राणासारखे खेळाडूही या मालिकेचा भाग असू शकतात. अभिषेक शर्मालाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचे पुनरागमनही निश्चित मानले जात आहे. इशान जवळपास वर्षभरापासून टीम इंडियातून बाहेर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत तो शेवटचा खेळला होता. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत तो मधल्या फळीत खेळू शकतो.
याआधीही तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता.
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ - ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रियान पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मुके कुमार, आवेश खान, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक).