मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AUS T-20: वर्ल्ड कप पराभवानंतर टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा

IND vs AUS T-20: वर्ल्ड कप पराभवानंतर टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 20, 2023 11:26 PM IST

India-Australia T20I Series : ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संघामध्ये टी-२० च्या ५ सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

India-Australia T20I Series
India-Australia T20I Series

वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर आता भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एक मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. विशाखापट्टणम येथे २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी सोमवारी रात्री भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या अनेक खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.  तर उपकर्णधारपदी रुतुराज गायकवाड याला संधी देण्यात आली आहे. शेवटच्या दोन सामन्यासाठी संघात सामील करण्यात आलेल्या श्रेयस अय्यरकडे त्यानंतर उपकर्णधार पदाची धूरा सोपवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सूर्यकुमार यादव सध्या टी-२० फॉरमॅटमध्ये नंबर एकचा फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवने भारतासाठी आतापर्यंत ५३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४६.०२ च्या सरासरीने आणि १७२.७ च्या स्ट्राईक रेटने १०६६ धावा केल्या आहेत.

भारत व ऑस्ट्रेलियामध्ये होणारी ५ सामन्यांची टी २० मालिका ३ डिसेंबरला संपणार आहे. बेंगळुरूमध्ये या मालिकेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.

टी-20 सीरीजसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कप्तान), ऋतुराज गायकवाड (उप-कप्तान), ईशान किशन,यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा,रिंकू सिंह,जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि  मुकेश कुमार.

WhatsApp channel

विभाग

Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर