मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, संघात नव्या वेगवान गोलंदाजाची एन्ट्री

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, संघात नव्या वेगवान गोलंदाजाची एन्ट्री

Feb 10, 2024 11:24 AM IST

Team india for England Test Series : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीला ब्रेक देण्यात आला आहे तर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे संघात परतले आहेत.

Team India Squad Announced for England Series
Team India Squad Announced for England Series (ANI)

India Squad For Final Three Tests Against England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला (Team India Squad Announced for England Series) आहे. मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. सध्या दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. 

उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा संघात परतले आहेत, पण या दोन्ही खेळाडूंना फिटनेसच्या आधारावर प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाईल. दुसरीकडे, विराट कोहली अजूनही निवडीसाठी उपलब्ध नाही. तर श्रेयस अय्यरची संघात निवड झालेली नाही. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याची निवड झाली नसल्याचे बोलले जात आहे. 

आकाश दीप कोण आहे?

विशेष म्हणजे, यावेळी बीसीसीआयने एकूण १७ खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. यात २७ वर्षांच्या आकाश दीप या नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली असून आकाशदीप वेगवान गोलंदाज आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

२७ वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या तीन सामन्यात १३ विकेट घेतल्या होत्या. बिहारमध्ये जन्मलेला आकाश दीप बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आकाशने २९ प्रथम श्रेणी सामन्यात १०३ बळी घेतले आहेत. तसेच, आकाशदीप आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो.

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यांसाठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

मालिकेतील उर्वरित सामने कधी आणि कुठे होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत अजून तीन सामने बाकी आहेत. मालिकेतील तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे रंगणार आहे, तर चौथी कसोटी २३ फेब्रुवारीपासून रांची येथे सुरू होणार आहे. 

मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळवली जाईल. दोन्ही संघ १२ फेब्रुवारीपर्यंत राजकोटला पोहोचू शकतात.

WhatsApp channel