भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना चेन्नईत होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. यासाठीची टीम लवकरच जाहीर होऊ शकते. टीम इंडियाची घोषणा कधी होईल याची तारीख जाहीर झालेली नाही, पण पुढच्या आठवड्यात निश्चितच भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनाही संधी देऊ शकते. पण ते त्यांच्या सध्याच्या फॉर्मवर अवलंबून असेल. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळू शकते.
यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. यशस्वी आणि शुभमन गिलचे संघातील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. शुभमनने दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर ही त्याच्यासाठी महत्त्वाची संधी असू शकते.
टीम इंडिया सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनाही संधी देऊ शकते. सरफराज आणि जुरेल यांनी भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतलेल्या रवींद्र जडेजालाही संधी मिळू शकते. जडेजा हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे.
टीम इंडिया स्पिनर्सवर विशेष लक्ष देऊ शकते. कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन हे भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांनाही संधी मिळू शकते. भारतीय संघ अर्शदीप सिंगच्या नावावरही विचार करू शकतो.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती दुलीप ट्रॉफीमधील खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष ठेवणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. पंतने दमदार पुनरागमन केले आहे. तो मुख्य यष्टिरक्षक फलंदाज बनू शकतो.
बांगलादेशविरुद्ध भारताचा संभाव्य कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज. मुकेश कुमार, आकाश दीप / अर्शदीप सिंग.
पहिला कसोटी सामना - १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर, सकाळी ९.३०, चेन्नई
दुसरा कसोटी सामना - २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, सकाळी ९.३०, कानपूर
पहिला T20 सामना - ६ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, धर्मशाला
दुसरा T20 सामना - ९ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, दिल्ली
तिसरा T20 सामना - १२ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, हैदराबाद