मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? या दिवशी खेळाडू अमेरिकेला रवाना होतील, पाहा

टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? या दिवशी खेळाडू अमेरिकेला रवाना होतील, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 30, 2024 10:17 PM IST

India Squad For 2024 T20 World Cup : आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. तर १९ मे रोजी टीम इंडिया फ्लोरिडाला रवाना होईल.

India Squad For 2024 T20 World Cup टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी?
India Squad For 2024 T20 World Cup टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? (PTI)

t20 world cup 2024 india squad : आगामी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आयसीसीने संघ जाहीर करण्यासाठी १ मे ही कट ऑफ तारीख दिली आहे. 

तसेच, वर्ल्डकप खेळणाऱ्या संघांना २५ मेपर्यंत त्यांच्या घोषित केलेल्या स्क्वाडमध्ये बदल करण्याची संधी मिळणार आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआयला याबाबत माहिती दिली. भारतीय संघाची निवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केली जाईल, सूत्राने सांगितले की, तोपर्यंत आयपीएलचा पहिला भाग संपेल आणि राष्ट्रीय निवड समिती खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेसचे मूल्यांकन करण्यास सक्षम असेल.

१९ मे रोजी संघ अमेरिकेला रवाना होईल

यानंतर १९ मे रोजी आयपीएलचा लीग टप्पा संपल्यानंतर क्रिकेटपटूंची पहिली तुकडी न्यूयॉर्कला रवाना होईल, असेही समोर आले आहे. यामध्ये अशा खेळाडूंचा समावेश असेल ज्यांचे संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकणार नाहीत. ते लवकर अमेरिकेला जातील आणि तेथील हवामान आणि परिस्थितीशी जुळवून घेतील. 

चार निवडकर्तेही संघासोबत प्रवास करतील

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने असेही सांगितले की, संघाचे स्टँडबाय खेळाडूही युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टूर्नामेंटसाठी प्रवास करतील. संघातील कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास त्याला ताबडतोब बदली करता येईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय ४ निवडकर्ते बहुतांश सामने पाहण्यासाठी आयोजक देशात उपस्थित असतील.

IPL_Entry_Point