IND vs SA : दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रमणदीप सिंग संघात, मयंक यादवला वगळलं!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA : दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रमणदीप सिंग संघात, मयंक यादवला वगळलं!

IND vs SA : दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रमणदीप सिंग संघात, मयंक यादवला वगळलं!

Oct 25, 2024 10:54 PM IST

Indian Team Announced for T20 Series South Africa : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ४ टी-20 सामने खेळणार आहे.

IND vs SA : दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रमणदीप सिंगसह या नव्या खेळाडूंना संधी
IND vs SA : दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रमणदीप सिंगसह या नव्या खेळाडूंना संधी

India Squad for South Africa T20 Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. मयंक यादव आणि शिवम दुबे यांची संघात निवड झालेली नाही. त्यांना दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेले नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार, आवेश खान, यश दयाल.

रियान परागला दुखापत

बीसीसीआयने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे, की रियान परागची संघात निवड करण्यात आलेली नाही, जो त्याच्या उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत ४० चेंडूत शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनने सध्या टी-20 संघात आपले स्थान राखून ठेवले आहे. दुसरीकडे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही अभिषेक शर्मा अपयशी ठरला होता, मात्र आता त्याला दक्षिण आफ्रिकेत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

इमर्जिंग टीम्स आशिया चषक स्पर्धेतही अभिषेक भारत अ संघासाठी एकही मोठी खेळी खेळू शकला नाही. नितीश कुमार रेड्डी याला टी-20 संघात स्थान मिळाले नाही. तो बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जात आहे.

Whats_app_banner