Team India For Champions Tophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी आज १८ जानेवारी (शनिवार) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. रोहित शार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
जसप्रीत बुमराह अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही, त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या ३ वनडे मालिकेत सामन्यांच्या त्याच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे.
या स्पर्धेतील पहिला सामना १९ फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. तर भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोहम्मद सिराज आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
करुण नायर देखील चर्चेत होता, ज्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ८ सामन्यात ७५२ धावा केल्या आहेत, त्याला देखील पुनरागमन करण्याची संधी देण्यात आलेली नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण ८ संघ खेळतील, ज्यांची २ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडिया अ गटात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशसोबत आहे. ग्रुप स्टेजमध्ये या तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात १९९८ साली झाली. भारताने आतापर्यंत दोन वेळा या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. २००२ मध्ये टीम इंडिया आणि श्रीलंका या स्पर्धेचे संयुक्त विजेते होते.
त्यानंतर अंतिम सामना पावसाने गमावला. त्याच वेळी, २०१३ मध्ये टीम इंडियाने अंतिम फेरीत इंग्लंडला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. दुसरीकडे आठ वर्षांनी ही स्पर्धा पुनरागमन करत आहे. गेल्या वेळी ही स्पर्धा २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता.
संबंधित बातम्या