IND vs SA : संजू-सूर्यासह टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज फ्लॉप, दक्षिण आफ्रिकेसमोर छोटे लक्ष्य
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA : संजू-सूर्यासह टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज फ्लॉप, दक्षिण आफ्रिकेसमोर छोटे लक्ष्य

IND vs SA : संजू-सूर्यासह टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज फ्लॉप, दक्षिण आफ्रिकेसमोर छोटे लक्ष्य

Nov 10, 2024 09:24 PM IST

IND vs SA 2nd T20 Scorecard : भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १२५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

IND vs SA : भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले, दक्षिण आफ्रिकेसमोर छोटे लक्ष्य
IND vs SA : भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले, दक्षिण आफ्रिकेसमोर छोटे लक्ष्य (AFP)

India vs South Africa 2nd T20 : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४ टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (१०नोव्हेंबर) खेळला जात आहे. गाकेबरहा येथे सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची अवस्था बिकट झाली. टीम इंडियाने यजमान आफ्रिकन संघासमोर १२५ धावांचे सोपे लक्ष्य ठेवले आहे.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ६ बाद १२४ धावा केल्या. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १२५ धावांचे लक्ष्य आहे. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. अभिषेक शर्मा ५ चेंडूत ४ धावा करून बाद झाला. सलग दोन शतकं करणारा संजू सॅमसन आज शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववर नजरा खिळल्या होत्या, मात्र त्याने निराशा केली.

सूर्यकुमार ९ चेंडूत ४ धावा करून बाद झाला. तिलक वर्माने २० चेंडूत २० धावा केल्या. अक्षर पटेलने २१ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले.

हार्दिक पांड्याने महत्त्वपूर्ण खेळी केली

भारताकडून अष्टपैलू हार्दिक पांड्याने ४५ चेंडूत सर्वाधिक ३९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. रिंकू सिंग ११ चेंडूत ९ धावा करूनबाद झाला

भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनच्या जवळ येत राहिले, पण हार्दिक पांड्याने चेंडू घट्ट पकडला. त्यामुळे भारतीय संघ १२४ धावांपर्यंत मजल मारू शकला.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मार्को यान्सेन, जेराल्ड कोएत्झी, अँडी सिमेलॉन, एडन मार्कराम आणि एन. पीटरने १-१ विकेट घेतली. मार्को यानसेनने ४ षटकांत २५ धावांत १ खेळाडू बाद केला. तर जेराल्ड कोएत्झीने ५ षटकात २५ धावा देत १ बळी मिळवला.

दरम्यान, भारताने पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. अशाप्रकारे भारतीय संघ ४ टी-20 सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

Whats_app_banner