भारत आणि बांगलादेश यांच्यात तिसरा टी-20 सामना खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाने २० षटकात २९७ धावांचा पाऊस पाडला आहे. या सामन्यातून टीम इंडियाने अनेक विक्रम रचले आहेत.
टी-20 क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे, परंतु टीम इंडियाची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या २६० धावा होती, जी त्यांनी २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध केली होती.
टीम इंडियाला २९७ धावांपर्यंत नेण्यात सर्वात मोठा वाटा संजू सॅमसनचा होता, त्याने अवघ्या ४७ चेंडूत १११ धावांची तुफानी खेळी केली.
सॅमसनने केवळ ४० चेंडूत शतक झळकावले, जे टी-20 मधील भारताची दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावलेहोते.
भारताने केवळ ७.१ षटकांत १०० धावांचा टप्पा गाठला आणि पुढील अर्धशतक गाठण्यासाठी केवळ २.४ षटके लागली. संघाने १४ षटकांत २०० धावांचा टप्पा ओलांडला. याआधी कोणत्याही संघाने अशी कामगिरी केली नव्हती.
नेपाळने २०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध २० षटकात ३१४ धावा केल्या होत्या. नेपाळच्या नावावर टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे आता क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या टीम इंडियाच्या नावावर झाली आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यापूर्वी, चेक प्रजासत्ताक या यादीत दुसऱ्या स्थानावर होता, त्यांनी २०१९ मध्ये तुर्कीविरुद्धच्या सामन्यात २७८ धावांची मोठी धावसंख्या केली होती. अफगाणिस्तानच्या नावावर २७८ धावांचा विक्रम आहे, जो त्यांनी२०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध केला होता.
३१४ धावा - नेपाळ (वि मंगोलिया)
२९७ धावा - भारत (वि. बांगलादेश)
२७८ धावा - झेक प्रजासत्ताक (वि. तुर्की)
भारताला या ऐतिहासिक धावसंख्येपर्यंत नेण्यात संजू सॅमसनने १११ धावांचे योगदान दिले. संजूने अवघ्या ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने या खेळीत ११ चौकार आणि ८ चौकार मारले. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव याने ३५ चेंडूत ७५ धावांची तुफानी खेळी केली, यादरम्यान त्याने ५े गगनचुंबी षटकार ठोकले.
हे दोघे बाद झाल्यानंतरही टीम इंडियाच्या फलंदाजीने धावफलक वेगाने पुढे सरकत ठेवला. रियान पराग आणि हार्दिक पांड्याने मिळून ८ षटकार ठोकले. परागने १४ चेंडूत ३४ धावा केल्या, तर पंड्याने १८ चेंडूत ४७ धावांची तुफानी खेळी केली. बांगलादेशच्या सर्व गोलंदाजांनी १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.