मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ZIM vs IND : टीम इंडियानं ठोकल्या २३४ धावा, अभिषेक शर्माचं शतक, रिंकू-ऋतुराजची तुफानी फलंदाजी

ZIM vs IND : टीम इंडियानं ठोकल्या २३४ धावा, अभिषेक शर्माचं शतक, रिंकू-ऋतुराजची तुफानी फलंदाजी

Jul 07, 2024 06:08 PM IST

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने शतक ठोकले आहे. त्याने अवघ्या ४६ चेंडूत शतक झळकावले. त्याचा हा दुसराच आंतरराष्ट्रीय सामना आहे.

ZIM vs IND : टीम इंडियानं ठोकल्या २३४ धावा, अभिषेक शर्माचं शतक, रिंकू-ऋतुराजची तुफानी फलंदाजी
ZIM vs IND : टीम इंडियानं ठोकल्या २३४ धावा, अभिषेक शर्माचं शतक, रिंकू-ऋतुराजची तुफानी फलंदाजी

भारतीय संघ सध्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. येथे आज (७ जुलै) उभय संघांमध्ये ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फंलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने २० षटकात २ बाद २३४ धावांचा डोंगर उभारला. झिम्बाब्वेला विजयासाठी २३५ धावा कराव्या लागणार आहेत.

या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब आणि संथ झाली. पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाची धावसंख्या म्हणजे पहिल्या ६ षटकांत एका विकेटवर ३० धावा होती. 

ट्रेंडिंग न्यूज

यानंतर १० षटकांत धावसंख्या एका विकेटवर ७४ धावा होती. त्यानंतर शेवटच्या ६० चेंडूत भारताने १६० धावांचा पाऊस पाडला. 

भारताकडून अभिषेक शर्माने ४७ चेंडूत १०० धावा, ऋतुराज गायकवाडने ४७ चेंडूत नाबाद ७७ धावा आणि रिंकू सिंगने अवघ्या २२ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. अभिषेकने ७ चौकार आणि ८ षटकार मारले. गायकवाडने ११ चौकार आणि एक षटकार लगावला. याशिवाय रिंकूने २ चौकार आणि ५ षटकार ठोकले. ऋतुराज आणि रिंकू यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ३६ चेंडूत ८७ धावांची नाबाद भागीदारी झाली. तर अभिषेकने गायकवाडसोबत १३७ धावांची भागीदारी केली.

अभिषेकने वेलिंग्टन मसकडजाला सलग तीन षटकार मारून शतक पूर्ण केले. मात्र, वेलिंग्टन मसकडजाच्या पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला.

तर पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशाप्रकारे झिम्बाब्वे मालिकेत १-0 ने पुढे आहे.

दोन्ही संघ

भारत : शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद.

झिम्बाब्वे: तदिवनाशे मारुमणी, इनोसंट कायो, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डायन मेयर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदनाडे (विकेटकीपर), वेस्ली माढवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझरबानी, तेंडाई चटारा.

WhatsApp channel