भारताने पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०२ धावा केल्या आहेत. कठीण पीचवर संजू सॅमसनच्या शतकामुळे टीम इंडिया २०० धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरली असून आता यजमान दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २०३ धावा कराव्या लागणार आहेत.
भारतीय संघाकडून सॅमसनने सर्वाधिक धावा केल्या, त्याने १०७ धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अभिषेक शर्मा पुन्हा अपयशी ठरला, तो केवळ ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार सूर्यकुमारही २१ धावा करून बाद झाला. तिलक वर्माने १८ चेंडूत ३३ धावांची खेळी खेळून नक्कीच प्रभावित केले.
पण भारतीय डावाचा सर्वात मोठा हिरो ठरला संजू सॅमसन, ज्याने ४७ चेंडूत शतक पूर्ण केले आणि ५० चेंडूत १०७ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १० षटकार मारले.
एकवेळ भारतीय संघाने २ गडी गमावून १६७ धावा केल्या होत्या आणि १५ व्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या ३ विकेट गमावून १६७ धावा झाली होती. पण टीम इंडियाला पुढच्या ५ षटकात केवळ ३५ धावा करता आल्या. जिथे भारत एकेकाळी २३०-२३५ धावांचे स्वप्न पाहत होता. तिथे शेवटच्या ५ षटकांच्या खराब कामगिरीने संपूर्ण खेळ खराब केला. भारतीय संघानेही शेवटच्या ५ षटकात ६ विकेट गमावल्या.
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.