India vs Australia Todays Match Playing 11 : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज (४ मार्च) दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पण या सामन्यात भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असेल? वरूण चक्रवर्ती याला संधी मिळेल का? भारतीय संघ ४ फिरकीपटूंसह मैदानात उतरणार का?
असे अनेक प्रश्न भारतीय चाहत्यांच्या मनात आहेत. याच प्रश्नांची उत्तरे आपण येथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वास्तविक, टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध ४ फिरकीपटूंसह उतरली होती. त्या सामन्यात वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती प्लेइंग इलेव्हनचा भाग होते. न्यूझीलंडविरुद्ध ५ विकेट्स घेतल्यानंतरही वरुण चक्रवर्तीचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झालेले नाही.
रोहित शर्मा म्हणाला की, आम्हाला खरोखर विचार करण्याची गरज आहे की आम्हाला ४ फिरकीपटूंसोबत खेळायचे असले तरी ४ फिरकीपटूंचा समावेश कसा करता येईल? मी हे सांगतोय कारण आम्हाला इथली परिस्थिती चांगलीच माहीत आहे.
रोहित शर्माने वरुण चक्रवर्तीचे कौतुक केले. भारतीय कर्णधार म्हणाला की न्यूझीलंडविरुद्ध त्याने दाखवून दिले की आपण काय करू शकतो, पण हीच वेळ आमच्यासाठी योग्य संयोजन निवडण्याची आहे. आम्हाला सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह जायचे आहे.
वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या भारतीय फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी १० षटके टाकली. कुलदीप यादवने ९.३ षटके टाकली. याशिवाय रवींद्र जडेजाने ८ षटके टाकली. अशा प्रकारे भारतीय संघाच्या फिरकीपटूंनी ३७.३ षटके टाकली.
वरुण चक्रवर्तीने ५ बळी घेतले. कुलदीप यादवला २ विकेट मिळाले. याशिवाय अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी १-१ फलंदाज बाद केले. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती/हर्षित राणा.
संबंधित बातम्या