IND vs NZ : दोन दिवसांनी सुरू होतेय भारत-न्यूझीलंड मालिका, दोन्ही संघ, लाइव्ह स्ट्रीमिंग A टू Z माहिती येथे पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs NZ : दोन दिवसांनी सुरू होतेय भारत-न्यूझीलंड मालिका, दोन्ही संघ, लाइव्ह स्ट्रीमिंग A टू Z माहिती येथे पाहा

IND vs NZ : दोन दिवसांनी सुरू होतेय भारत-न्यूझीलंड मालिका, दोन्ही संघ, लाइव्ह स्ट्रीमिंग A टू Z माहिती येथे पाहा

Oct 14, 2024 09:29 PM IST

India vs New Zealand Live Streaming : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. यानंतर २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान दोन्ही संघ पुण्यात आमनेसामने येतील.

IND vs NZ : दोन दिवसांनी सुरू होतेय भारत-न्यूझीलंड मालिका, दोन्ही संघ, लाइव्ह स्ट्रीमिंग A टू Z माहिती येथे पाहा
IND vs NZ : दोन दिवसांनी सुरू होतेय भारत-न्यूझीलंड मालिका, दोन्ही संघ, लाइव्ह स्ट्रीमिंग A टू Z माहिती येथे पाहा

New Zealand Tour Of India : sभारतीय संघाने कसोटी मालिकेत बांगलादेशचा २-० असा पराभव केला. आता टीम इंडियासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडविरुद्धची मालिका खूपच रोमांचक होणार आहे. भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडचा पराभव करून WTC Sगुणतालिकेत आपले स्थान मजबूत करू इच्छित आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. यानंतर २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान दोन्ही संघ पुण्यात आमनेसामने येतील. 

त्याचबरोबर या मालिकेतील तिसरी कसोटी १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईत खेळवली जाणार आहे. 

दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. तर न्यूझीलंडच्या वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता कसोटी सुरू होईल.

लाइव्ह टेलिकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंग 

भारतीय चाहत्यांना Sports18 नेटवर्क चॅनेलवर भारत आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. स्पोर्ट्स १८ नेटवर्ककडे या मालिकेचे प्रसारण अधिकार आहेत. 

याशिवाय, भारत आणि न्यूझीलंड मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि साइटवर उपलब्ध असेल. तर न्यूझीलंडमध्ये स्काय स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपण केले जाईल.

न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप

राखीव खेळाडू: हर्षित राणा, मयंक यादव, प्रसिध कृष्णा आणि नितीश कुमार रेड्डी

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघ-

टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, इश सोधी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊदी, केन विल्यमसन आणि विल यंग.

Whats_app_banner