भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा (२ नोव्हेंबर) खेळ संपला आहे. यष्टीमागे न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ९ गडी बाद १७१ धावा केल्या आहेत.
एजाज पटेल ७ धावा करून क्रीजवर आहे. न्यूझीलंडकडे आतापर्यंत केवळ १४३ धावांची आघाडी असून त्यांची एक विकेट शिल्लक आहे. दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने ४ आणि अश्विनने ३ बळी घेतले. आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदरने १-१ विकेट घेतली आहे. आज दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे १५ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले.
तत्पूर्वी, या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे भारताला २८ धावांची आघाडी मिळाली.
याआधी भारताने दुसऱ्या दिवसाच्या ४ बाद ८४ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भारतासाठी ९६ धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. त्यामुळे भारतीय संघ २६३ धावांवर बाद झाला.
दुसऱ्या डावात न्यूझीलंडची सुरुवात काही खास नव्हती. पहिल्याच षटकात न्यूझीलंडने कर्णधार टॉम लॅथमची विकेट गमावली, तो एक धाव करून आकाश दीपच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
यानंतर वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला, जेव्हा त्याने डेव्हन कॉनवेला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. कॉनवे बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ३९/२ होती. कॉनवेने २२ धावा केल्या. भारतीय संघाला लवकरच तिसरे यश मिळाले, रचिन रवींद्रने (४ धावा) मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि आर. अश्विनच्या चेंडूवर स्टंप्मिंग आऊट झाला.
यानंतर डॅरिल मिशेल आणि विल यंग यांनी चौथ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. ही धोकादायक भागीदारी संपुष्टात आणण्याचे काम रवींद्र जडेजाने केले. त्याने मिशेलला आर. अश्विनने झेलबाद केले. मिशेलने ४४ चेंडूत २१ धावा केल्या, ज्यात एक चौकार आणि एक षटकार होता.
त्यानंतर जडेजाने यष्टिरक्षक टॉम ब्लंडेललाही बोल्ड केले, तो केवळ ४ धावा करू शकला. ब्लंडेल बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद १०० अशी होती.
टॉम ब्लंडेल बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या ग्लेन फिलिप्सने आक्रमक फलंदाजी करत तीन षटकार ठोकले. अश्विनने त्याची झंझावाती खेळी संपवली. फिलिप्स २६ धावा करून अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. फिलिप्स बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या १३१/६ अशी होती.
यानंतर रवींद्र जडेजाने ईश सोधीला बाद करून न्यूझीलंडला सातवा धक्का दिला. त्यानंतर अश्विनने विल यंगला वॉक केले. यंगने १०० चेंडूंचा सामना करत ५१ धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि एक षटकार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर जडेजाने मॅट हेन्रीला (१० धावा) बोल्ड केले.
तत्पूर्वी, याआधी भारताने दुसऱ्या दिवसाच्या ४ बाद ८४ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भारतासाठी ९६ धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. त्यामुळे भारतीय संघ २६३ धावांवर बाद झाला.
ऋषभ पंत ५९ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि २ षटकार मारले. तर शुभमन गिलने १४६ चेंडूत ९० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १ षटकार मारला. यानंतर भारतीय फलंदाजांची सतत पॅव्हेलियनमध्ये परतण्याची प्रक्रिया सुरू झाली.
सर्फराज खान एकही धाव न काढता बाद झाला. रवींद्र जडेजाने १४ धावा केल्या. तर रवी अश्विनने ६ धावांचे योगदान दिले. आकाशदीप शून्यावर बाद झाला. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने ३८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
न्यूझीलंडसाठी एजाज पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. एजाज पटेलने ५ फलंदाजांना बाद केले. याशिवाय मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोधीने प्रत्येकी १ बळी घेतला.
संबंधित बातम्या