1st Test India Vs England 2024 Day 4 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य दिले आहे. आज चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ४२० धावांवर आटोपला.
इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात ऑली पोपने शानदार १९६ धावांची खेळी केली. पोपने २७८ चेंडूंचा सामना करताना २१ चौकार मारले. पोपशिवाय बेन डकेटने ४७ धावांचे योगदान दिले. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ आणि आर. अश्विनने ३ विकेट घेतल्या. इंग्लंडने
त्याआधी ऑली पॉपने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत काही महत्वपूर्ण भागिदारी रचल्या. शेवटच्या फलंदाजांनीही पोपला सुरेख साथ दिली. शेवटी रेहान अहमदने २८ आणि टॉम हार्टलेने ३४ धावांचे योगदान दिले. पोपने या दोन्ही फलंदाजांसोबत अर्धशतकी भागिदारी केली.
इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्या डावात २४६ धावा केल्या होत्या. तर भारताने पहिल्या डावात ४३६ धावा केल्या. यानंतर पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे १९० धावांची आघाडी होती.
इंग्लंडने दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या डावात इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज जॅक क्राउली आणि बेन डकेट यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी झाली. बेन डकेट ४५ धावा करून बाद झाला तर जॅक क्रॉलीने ३१ धावांचे योगदान दिले. पण जो रूट आणि बने स्टोक्स स्वस्तात बाद झाले.
अश्विनने जॅक क्रॉलीला बाद केले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने बेन डकेटच्या रुपात दुसरी विकेट घेतली. डकेट ४७ धावांवर क्लीन बोल्ड झाला. यानंतर बुमराहने जो रूटला २ धावांवर पायचीत केले. रवींद्र जडेजाने जॉनी बेअरस्टोला तर अश्विनने बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड केले.रूट, स्टोक्स आणि बेयरस्टोला विशेष काही करता आले नाही.
यानंतर ऑली पॉपने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत काही महत्वपूर्ण भागिदारी रचल्या. शेवटच्या फलंदाजांनीही पोपला सुरेख साथ दिली. शेवटी रेहान अहमदने २८ आणि टॉम हार्टलेने ३४ धावांचे योगदान दिले. पोपने या दोन्ही फलंदाजांसोबत अर्धशतकी भागिदारी केली.
संबंधित बातम्या