दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी करत कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना १०९ धावांनी जिंकला. आफ्रिकेच्या या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही बदल झाला आहे. या सामन्यासाठी डॅन पीटरसन याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
श्रीलंकेने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या. यादरम्यान रायन रिक्लेटन आणि काइल व्हॉरेन यांनी शतके झळकावली. रिक्लेटनने ११ चौकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या. तर वोरेनने नाबाद १०५ धावा केल्या.
कर्णधार बावुमाने ७८ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ३१७ धावा केल्या. यादरम्यान बावुमा आणि एडिन मार्कराम यांनी अर्धशतके झळकावली. बावुमाने ६६ धावांची तर मार्करामने ५५ धावांची खेळी खेळली.
श्रीलंकेनेही दक्षिण आफ्रिकेला चोख प्रत्युत्तर देत पहिल्या डावात ३२८ धावा केल्या. यावेळी पथुम निसांकाने ८९ धावांची खेळी केली. त्याने ११ चौकार आणि १ षटकार मारला. कामिंदू मेंडिसने ४८ धावांची खेळी केली. मॅथ्यूजने ४४ धावांचे योगदान दिले.
पण श्रीलंकन संघ दुसऱ्या डावात २३८ धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान कर्णधार धनंजया डी सिल्वाने ५० धावा केल्या. कुसल मेंडिसने ४६ धावांचे योगदान दिले. संघाला १०९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी आतापर्यंत १० सामने खेळले आहेत आणि ६ जिंकले आहेत. तर ३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी १४ सामने खेळले असून ९ जिंकले आहेत. तर ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. भारताने १६ सामने खेळले असून ९ जिंकले आहेत. तर ६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
संबंधित बातम्या