भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये १० महिन्यांत काही खास औषधांनी आर्यनचा कसा कायापालट झाला हे दिसत आहे.
आर्यन बांगर याचा हा व्हिडिओ त्याच्या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन प्रवासाचा आहे, ज्यामध्ये तो एका मुलाचा मुलगी बनताना दिसत आहे. आर्यनने व्हिडीओसोबत एक लांबलचक मेसेजदेखील लिहिला आहे आणि लिंग परिवर्तनाबद्दलचे त्याचे अनुभव सांगितले आहेत.
वास्तविक, भारतीय संघाचा माजी क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याने नुकतेच त्याचे लिंग बदलले आहे. आर्यन मुलाचा मुलगी झाला आहे. औषध आणि शस्त्रक्रियेद्वारे त्याने आपल्या शरीरात परिवर्तन घडवून आणले आहे. त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. आर्यनने त्याचे नाव बदलून अनाया ठेवले आहे.
आर्यन (अनया) मुलगी झाल्यानंतर ती खूप खुश आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने लिहिले की, क्रिकेट खेळण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप त्याग केला. पण या खेळापलीकडेही माझा स्वतःच्या शोधाचा प्रवास आहे. हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता, पण माझ्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मिळवलेला विजय महत्त्वाचा आहे.
“ट्रान्सफॉर्मेशन (HRT) दरम्यान तुम्ही अनुभवलेले शारीरिक बदल तुमच्यासाठी एक कठोर वास्तव बनत आहेत, हा अनुभव केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही कठीण असू शकतो, कारण तुम्ही तुमच्या ओळखीचा आणि तुमच्या शरीराचा बराच काळ गमावला आहे. काळाला एका विशिष्ट स्वरूपात जावे लागते. मी माझे स्नायू वस्तुमान, सामर्थ्य, स्नायूंची स्मरणशक्ती आणि ऍथलेटिक क्षमता गमावत आहे ज्यावर मी एकदा अवलंबून होते. मला खूप दिवसांपासून आवडणारा खेळ माझ्यापासून दूर जात आहे. ”
आर्यन (अनया) त्याचे वडील संजय बांगर यांच्याप्रमाणेच क्रिकेटर आहे. तो डावखुरा फलंदाज आहे जो इस्लाम जिमखाना या स्थानिक क्रिकेट क्लबसाठी क्रिकेट खेळतो. याशिवाय त्याने लीसेस्टरशायरमधील हिंकले क्रिकेट क्लबसाठी बॅटने खूप धावा केल्या आहेत.
सध्या, अनाया मँचेस्टरमध्ये राहते, जिथे ती देशातील एका क्लबसाठी क्रिकेट खेळत आहे. ती कोणत्या क्लबसाठी खेळते हे अद्याप कळू शकलेले नाही, परंतु अलीकडेच सध्याच्या इंस्टाग्राम रीलमध्ये तिने एका सामन्यात १४५ धावा केल्या असल्याचे दिसून आले.