क्रिकेटर शिवम दुबे याच्या पत्नीने भाजप नेत्याला फटकारलं, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  क्रिकेटर शिवम दुबे याच्या पत्नीने भाजप नेत्याला फटकारलं, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

क्रिकेटर शिवम दुबे याच्या पत्नीने भाजप नेत्याला फटकारलं, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Published Aug 13, 2024 02:10 PM IST

भारतीय क्रिकेटर शिवम दुबे याची पत्नी अंजुम खान हिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. यामध्ये तिने भाजप नेत्या नाझिया इलाही यांच्या अटकेची मागणी केली होती. आता या पोस्टवरून प्रचंड गोंधळ उडाला आहे.

क्रिकेटर शिवम दुबे याच्या पत्नीने भाजप नेत्याला फटकारलं, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
क्रिकेटर शिवम दुबे याच्या पत्नीने भाजप नेत्याला फटकारलं, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याची पत्नी अंजुम खान सध्या चर्चेत आली आहे. खरं तर अंजुम खान हिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती, यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे.

या व्हायरल झालेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अंजुमने भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांच्या अटकेची मागणी केली आहे. नाझिया इलाही खान या भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या सदस्या आहेत.

अंजुम खान यांची पोस्ट

शिवम दुबेची पत्नी अंजुम खानने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, "पैगंबराच्या सन्मानाचा अपमान करणाऱ्यांची तुम्हाला चीड येत नसेल तर तुम्ही मेलेले आहात. जर तुमचा इमान जिवंत असेल तर माझ्यासोबत #ArrestNaziaElahiKhan असे लिहा."

अंजुमने पुढे लिहिले की, "सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की, आता या नाझिया खानची दखल घेण्याची वेळ आली आहे. ती आधी मुस्लिमांविरुद्ध तर बोलतच होती, पण ती आता गुरु पैगंबरांच्या विरोधातही बकवास करत आहे."

दरम्यान, ही पोस्ट व्हायरल होताच अंजुम खानने ती डिलीट केली.

कोर्टात भेटू, नाझिया इलाही यांचे प्रत्युत्तर

शिवम दुबे याच्या पत्नीच्या पोस्टवर भाजप नेत्या नाझिया इलाही यांनीही रिप्लाय दिला आहे. नाझिया इलाही यांनी X वर लिहिले, की "मॅडम, तुम्ही एका हिंदूशी लग्न केले आहे. इस्लामनुसार तुम्ही आता मुस्लिम नाही. तुमचा विवाह इस्लामनुसार मान्य नाही, मी हे घटनात्मक न्यायालय आणि शरिया न्यायालयात सिद्ध करेन.

तसेच, नाझिया इलाही यांनी या पोस्टमध्ये क्रिकेटर शिवम दुबे यालाही टॅग करत पुढे लिहिले की, तुमच्या पत्नीने माझ्या विरोधात जो प्रक्षोभक, द्वेषपूर्ण, गंभीर मजकूर पोस्ट केला आहे तो आता तिला सिद्ध करावे लागेल, मी नोटीस पाठवली आहे, माझी हिंमत तेव्हाच कळेल जेव्हा तुमची पत्नी न्यायालयात येऊन उत्तर देईल."

Whats_app_banner

संबंधित बातम्या