Team India Cricket Schedule in 2024: भारतीय क्रिकेट संघ गेल्या काही वर्षांपासून खूप क्रिकेट खेळत आहे. नवीन वर्षातही भारतीय संघाला आयपीएलसह एकूण मालिका खेळायच्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाशी भिडणार आहे. यावर्षी भारतीय संघ सर्वाधिक कसोटी क्रिकेट खेळणार आहे. यादरम्यान, भारताला जून महिन्यात आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा देखील खेळायची आहे.
भारतीय संघाला २०२४ चा पहिला सामना आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यानंतर भारतीय संघ मायदेशी परतेल आणि मे महिन्यापर्यंत आपल्या घरच्या सामन्यांमध्ये आणि आयपीएल २०२४ मध्ये भाग घेईल. टीम इंडियाला जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी व्हायचे आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धेला फार कमी सामने शिल्लक आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर टीम इंडिया ११ डिसेंबरपासून मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल, जी आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा एक भाग असेल. ही मालिका मायदेशात खेळवली जाणार आहे. त्यानंतर आयपीएलचे आयोजन केले जाईल, आणि त्यानंतर टी-20 विश्वचषक खेळवला जाईल.
टी-२० विश्वचषक 2024 नंतर टीम इंडिया श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात ३-३ सामन्यांची टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. यानंतर बांगलादेशचा संघ भारत दौरा करणार आहे. या दोघांमध्ये दोन कसोटी आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. या मालिकेनंतर न्यूझीलंडचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येईल. वर्षाच्या शेवटी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामने खेळायचे आहेत. अशाप्रकारे २०२४ मध्ये भारत एकूण १४ कसोटी सामने होणार आहेत.
जानेवारी- भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी सामना
जानेवारी- अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका (मायदेशात)
जानेवारी ते मार्च- इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका (मायदेशात)
मार्च ते मे- आयपीएल २०२४ स्पर्धा
जून- टी-२० विश्वचषक २०२४
जुलै- श्रीलंकाविरुद्ध ३-३ सामन्यांची टी-२० आणि एकदिवसीय मालिका
ऑगस्ट- बांगलादेशविरुद्ध २ कसोटी आणि ३ टी-२० मालिका (मायदेशात)
ऑक्टोबर ते नोव्हेंबर- न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका (मायदेशात)
डिसेंबर- ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका