युवराज सिंग कर्णधार, रैना-भज्जीसह दिग्गज संघात, इंग्लंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  युवराज सिंग कर्णधार, रैना-भज्जीसह दिग्गज संघात, इंग्लंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा

युवराज सिंग कर्णधार, रैना-भज्जीसह दिग्गज संघात, इंग्लंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा

Jun 01, 2024 04:56 PM IST

india champions squad world champions of legends 2024 : इंडिया चॅम्पियन्स संघाची जर्सी शुक्रवारी (३१ मे) नवी दिल्लीत लॉन्च करण्यात आली. यावेळी सुरेश रैना, आरपी सिंग आणि राहुल शर्मा उपस्थित होते.

world champions of legends 2024 : युवराज सिंग कर्णधार, रैना-भज्जीसह दिग्गज संघात, इंग्लंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा
world champions of legends 2024 : युवराज सिंग कर्णधार, रैना-भज्जीसह दिग्गज संघात, इंग्लंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा

world champions of legends 2024 : इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळली जाणार असून या स्पर्धेसाठी भारताने आपला संघ जाहीर केला आहे. इंडिया चॅम्पियन्स संघाची कमान युवराज सिंग याच्याकडे सोपवण्यात आली आहे. या संघात अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांचाही समावेश आहे.

इंडिया चॅम्पियन्स संघाची जर्सी शुक्रवारी (३१ मे) नवी दिल्लीत लॉन्च करण्यात आली. यावेळी सुरेश रैना, आरपी सिंग आणि राहुल शर्मा उपस्थित होते. या लीगमध्ये एकूण ६ देश सहभागी होणार आहेत. हे सामने ३ जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळवले जातील. १३ जुलै रोजी अंतिम सामना होणार आहे.

युवराज सिंग कर्णधार असेल

इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) द्वारे मान्यताप्राप्त वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स या स्पर्धेत जगभरातील निवृत्त झालेले दिग्गज क्रिकेटपटू एकत्रित येतील. भारतीय क्रिकेटच्या स्टार खेळाडूंनी सजलेला १५ सदस्यीय इंडिया चॅम्पियन संघ जाहीर करण्यात आला. २००७ टी-20 विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक विजेते सुरेश रैना, आरपी सिंग यांना संघात स्थान मिळाले आहे.

भारताचे सामने कधी?

३ जुलै- इंग्लंड विरुद्ध भारत

५ जुलै- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

६ जुलै- भारत विरुद्ध पाकिस्तान

८ जुलै- भारत ऑस्ट्रेलिया झाला

१० जुलै- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

इंडिया चॅम्पियन संघ:-

युवराज सिंग (कर्णधार), हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, युसूफ पठाण, गुरकीरत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंग, विनय कुमार, धवल कुलकर्णी.

Whats_app_banner