Champions Trophy : भारताच्या महिला हॉकी संघानं रचला इतिहास चीनचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Champions Trophy : भारताच्या महिला हॉकी संघानं रचला इतिहास चीनचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

Champions Trophy : भारताच्या महिला हॉकी संघानं रचला इतिहास चीनचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

Nov 20, 2024 09:06 PM IST

Bihar Womens Asian Champions Trophy Rajgir : भारताने महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चीनचा पराभव करून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले आहे.

Champions Trophy : भारताच्या महिला हॉकी संघानं रचला इतिहास चीनचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
Champions Trophy : भारताच्या महिला हॉकी संघानं रचला इतिहास चीनचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

भारतीय पोरींनी महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये कमाल केली आहे. भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये चीनचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतीय संघाने हे विजेतेपद पटकावण्याची ही तिसरी वेळ आहे. 

भारताकडून सामन्यातील एकमेव गोल दीपिकाने ३१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरमध्ये केला. भारत आणि चीन यांच्यातील लढत पाहण्यासाठी बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रचंड गर्दी झाली होती. 

भारत आणि चीन यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पहिले दोन क्वार्टर गोलशून्य राहिले, म्हणजेच हाफ टाईमपर्यंत कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. मात्र तिसऱ्या क्वार्टरला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचे दीपिकाने गोलमध्ये रूपांतर केले.

या स्पर्धेपूर्वीच सलीमा टेटे यांना भारतीय संघाची कर्णधार बनवण्यात आले होते आणि तिच्या पहिल्याच प्रोजेक्टमध्ये तिने टीम इंडियाला चॅम्पियन बनवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

चीनने शेवटच्या क्षणापर्यंत गोल करण्याचा अथक प्रयत्न केला. पण त्यांना गोल करता आला नाही

भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन 

भारताने यापूर्वी दोनदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे.२०१६  मध्ये टीम इंडियाने चीनचा २-१ असा पराभव केला होता. २०२३ मध्ये, भारतीय संघाने विजेतेपदाच्या सामन्यात जपानचा ४-० असा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती.

गेल्या पाच स्पर्धेत भारताने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे, तर दुसरीकडे चीनने इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती, मात्र यावेळीही निराशा झाली. भारताचा हा विजय सुद्धा संस्मरणीय आहे कारण त्याने एकही सामना न गमावता स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

Whats_app_banner