On This Day India Won Border Gavaskar Trophy 2018-19 : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानांवर हरवणे सोपे नाही. कारण ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात आणखी बलाढ्य बनतो. पण भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवण्याचा विक्रम दोनदा केला आहे. आपण येथे पहिल्या ऐतिहासिक मालिका विजयाची गोष्ट जाणून घेणार आहोत.
आजच्या दिवशी (७ जानेवारी) २०१९ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी मालिका विजय मिळवला होता. भारताने सिडनी कसोटी अनिर्णित राखून मालिका २-१ अशी खिशात घातली होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०१८-१९ चा शेवटचा कसोटी सामना सिडनीत खेळला गेला होता. हा सामना अर्निणित राखून भारताने ७० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कांगारूंना हरवून इतिहास रचला.
या मालिकेतील मालिकेतील शेवटची कसोटी ३ ते ७ जानेवारी २०१९ दरम्यान खेळली गेली, जी पावसामुळे अनिर्णित राहिली.
भारताने या सिडनी कसोटीत पहिला डाव ७ गडी गमावून ६२२ धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात ३०० धावांत गारद झाला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला होता, मात्र पावसामुळे दुसरा डाव होऊ शकला नाही.
भारताच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने १९३ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ३७३ चेंडूंचा सामना केला आणि २२ चौकार मारले. त्याच्याशिवाय ऋषभ पंतने १८९ चेंडूत १५९ धावा केल्या होत्या. आपल्या खेळीत त्याने १५ चौकार आणि एक षटकार लगावला.
परदेशी भूमीवर पंतचे हे दुसरे कसोटी शतक ठरले. या दोघांशिवाय रवींद्र जडेजा आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतके झळकावली होती. जडेजाने ११४ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८१ धावा केल्या होत्या. तर मयंकने ११२ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवने ५ बळी घेतले. मोहम्मद शमी, जडेजाने प्रत्येकी २ गडी बाद केले. बुमराहने एक विकेट घेतली होती. या संपूर्ण मालिकेत बुमराहने २१ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.
संबंधित बातम्या