गाबा कसोटीतील चौथ्या दिवसाचा (१७ डिसेंबर) खेळ संपला आहे. जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी १०व्या विकेटसाठी ३९ धावांची झुंजार भागीदारी करत फॉलोऑन वाचवला आहे. दोघांनीही कमालीचे धाडस दाखवत फॉलोऑन टाळला. भारताची ९वी विकेट पडली तेव्हा टीम इंडियाला फॉलोऑन वाचवण्यासाठी ३३ धावांची गरज होती.
भारताची धावसंख्या आता ९ विकेट्सवर २५२ धावा असून ऑस्ट्रेलियाच्या १९३ धावांनी मागे आहे. आकाशदीप २७ आणि बुमराह १० धावांवर नाबाद परतल आहे.
फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २४६ धावा करायच्या होत्या. भारताची धावसंख्या २४२ धावा झाली असताना आकाश दीपने चौकार मारून काम पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. आता गाब्बा कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ १८ डिसेंबरपासून सुरू होईल, जिथे ऑस्ट्रेलियन संघाला फलंदाजीसाठी उतरावे लागणार आहे.
काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ५१ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. विराट कोहली, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाले. चौथ्या दिवशी भारताने आपला डाव ५१ धावांवरून सुरू केला, मात्र कर्णधार रोहित शर्मा केवळ १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
मात्र येथून केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने कमान सांभाळली. राहुलने ८४ धावा केल्या, तर जडेजाने ७७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
भारताच्या ५ विकेट ७४ च्या स्कोअरवर पडल्या होत्या, अशा स्थितीत टीमला फॉलोऑन वाचवण्याचा धोका होता. अशा स्थितीत राहुल आणि जडेजा यांच्यातील ६७ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला सामन्यात आणले.
राहुल बाद झाल्यानंतर जडेजाने नितीश रेड्डीसोबत ५३ धावांची भागीदारी केली. या दोन भागीदारी होऊनही, एके वेळ भारतीय संघाने २१३ धावांवर ९ विकेट गमावल्या होत्या आणि फॉलोऑन वाचवण्यासाठी ३३ धावा करायच्या होत्या.
येथून जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी १०व्या आणि ११व्या क्रमांकाचे फलंदाज असूनही फलंदाजीत परिपक्वता दाखवली. चौथ्या दिवसअखेर आकाशदीप २७ धावांवर नाबाद तर जसप्रीत बुमराह १० धावांवर नाबाद आहे.
त्यांच्या ३९ धावांच्या भागीदारीने ब्रिस्बेन कसोटीत भारताला जिवंत ठेवले आहे. फॉलोऑन टाळण्यात अपयश आले असते तर, ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले असते, ज्यामुळे टीम इंडियाचा पराभवाचा धोका वाढला असता. तसेच, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याच्या टीम इंडियाच्या अपेक्षांनाही मोठा धक्का बसला असता.
संबंधित बातम्या