भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडिया ३०७ धावांवर सर्वबाद झाली आहे. भारताकडून ध्रुव जुरेलने ९५ धावांची झुंजार खेळी केली. यानंतर पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लंडला ४६ धावांची आघाडी मिळाली.
जुरेलने १४९ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९० धावा केल्या. जुरेलच्या या खेळीने भारताला ३०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली. तर इग्लंडकडून फिरकी गोलंदाज शोएब बशीरने सर्वाधिक ५ बळी घेतले.
भारताने कालच्या ७ बाद २१९ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ७६ धावांची (२०२ चेंडू) भागीदारी केली. या भागिदारीमुळेच टीम इंडिया सामन्यात परतली आहे. कुलदीप यादवने १३१ चेंडूत २८ धावा केल्या.
भारताकडून ध्रुवर जुरेलने ९० तर यशस्वी जैस्वालने ७३ धावांची खेळी केली. जैस्वालने ११७ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि १ मारला. भारताचे इतर फलंदाज फ्लॉप ठरले.
तत्पू्र्वी, दुसऱ्या दिवशी (२४ फेब्रुवारी) इंग्लंडला पहिल्या डावात ३५३ धावांत गुंडाळल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा २ धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिलने पुन्हा एकदा चांगली सुरुवात केली, मात्र ३८ धावा केल्यानंतर तो विकेट फेकून निघून गेला. यानंतर रजत पाटीदारने पुन्हा एकदा निराशा केली आणि तो १७ धावा करून तो स्वस्तात बाद झाला.
संबंधित बातम्या