IND vs SA Test : टीम इंडिया ऑलआऊट! दोन षटकात शुन्य धावा आणि ६ विकेट, भारतासोबत हे काय घडलं? पाहा-india all out on 153 in 1st inning vs south africa 2nd test match cricket ind vs sa test match scorecard at newlands ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA Test : टीम इंडिया ऑलआऊट! दोन षटकात शुन्य धावा आणि ६ विकेट, भारतासोबत हे काय घडलं? पाहा

IND vs SA Test : टीम इंडिया ऑलआऊट! दोन षटकात शुन्य धावा आणि ६ विकेट, भारतासोबत हे काय घडलं? पाहा

Jan 03, 2024 07:57 PM IST

India Vs South Africa Test : भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना आजपासून (३ जानेवारी) केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ 55 धावांत गडगडला.

India Vs South Africa Test
India Vs South Africa Test (REUTERS)

india vs south africa 2nd test match :भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून (३ जानेवारी) खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

यानंतर आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या ५५ गारद झाली. प्रत्युत्तरात भारतीय संघदेखील १५३ धावांवर सर्वबाद झाला. भारताने पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी मिळवली.

पण, भारताच्या डावातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, टीम इंडियाला शेवटच्या ६ फलंदाजांच्या मोबदल्यात एकही धाव करता आली नाही.

म्हणजेच, भारताने शेवटच्या ६ विकेट्स एकही धाव न करता गमावल्या आहेत. एकवेळ भारताची धावसंख्या ४ बाद १५३ अशी होती. विराट कोहली आणि लोकेश राहुल फलंदाजी करत होते. पण १५३ धावसंख्येवर राहुल बाद झाला. यानंतर टीम इंडियाला पुढे एकही धाव करता आली नाही. भारत १५३ धावांवर ऑलआऊट झाला.

दोन षटकात भारताचा गेम झाला

भारतीय डावाचे ३४वे षटक लुंगीसानी एनगिडीने टाकले. लुंगी एनगिडीने त्या षटकातील पहिल्या चेंडूवर केएल राहुलला विकेटकीपरकरवी झेलबाद केले. यानंतर जडेजा फलंदाजीस आला, जडेजाने एक चेंडू खेळून काढला पण या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तोही मार्को यान्सनेच्या हाती झेलबाद झाला. यानंतर बुमराह फलंदाजीस आला, बुमराहनेही एक चेंडू खेळून काढला आणि पुढच्या चेंडूवर स्लीपमध्ये झेलबाद झाला. अशा प्रकारे या षटकात एनगिडीने एकूण तीन फलंदाज बाद केले.

यानंतर पुढचे म्हणजेच, ३५वे षटक कागिसो रबाडाने टाकले. रबाडाने या षटकातील पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला स्लीपमध्ये झेल द्यायला भाग पाडले. कोहली बाद झाल्यानंतर प्रसिद्ध कृष्णा फलंदाजीस आला, त्यानेही एक चेंडू खेळून काढला. पुढच्या चेंडूवरही त्याने डिफेन्स केला पण नॉन स्ट्रायकर सिराजला धा घ्यायची होती. पण या प्रयत्नता तो धावाबाद झाला. यानंतर प्रसिद्ध कृष्णा रबाडाच्या पुढच्या चेंडूवर स्लीपमध्ये झेलबाद झाला. अशा प्रकारे दोन षटकात भारताने ६ फलंदाज गमावले आणि एकही धाव केली नाही. 

भारताचे तीनच फलंदाज दुहेरी गाठू शकले

भारताचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने ३९ धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने ३६ आणि विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावा केल्या. 

या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुललाच आपले खाते उघडता आले. त्याने ८ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार हे फलंदाज शुन्यावर बाद झाले. मुकेश कुमार एकही चेंडूचा सामना न करता नाबाद राहिला.

तर दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. भारताचा १ फलंदाज धावबाद झाला. मात्र, पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे ९८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे. 

खेळपट्टीचे स्वरूप पाहता भारतीय संघ सामन्यात पुढे आहे. आता या परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारतीय गोलंदाज हा सामना डावाच्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करतील. खेळपट्टीचा विचार करता भारतासाठी ५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्यही अवघड असू शकते.

Whats_app_banner