टी-20 वर्ल्डकप २०२४ चा १९ वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने १९ षटकात सर्वबाद ११९ धावा केल्या.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची फलंदाजी खूपच खराब झाली. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर, सर्वकाही अपयशी ठरले. शेवटच्या षटकात शेपटीच्या फलंदाजांच्या काही धावांमुळे भारताला ११९ धावांपर्यंत मजल मारता आली.
रोहित शर्मा १३ धावा, विराट कोहली ४ धावा, अक्षर पटेल २० धावा, सूर्यकुमार यादव ७ धावा, शिवम दुबे ३ धावा करून बाद झाला, हार्दिक पंड्या ७ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना खातेही उघडता आले नाही.
त्याचवेळी अर्शदीप सिंग ९ धावा करून धावबाद झाला. सिराज ७ धावा करून नाबाद राहिला.
भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ४२ धावा केल्या. त्याने ३१ चेंडूत ६ चौकार मारले. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर मोहम्मद आमिरने २ विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीला एक विकेट मिळाली.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, हरिस रौफ.
संबंधित बातम्या