इमर्जिंग आशिया चषक २०२४ ची दुसरी सेमी फायनल भारत अ आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळली जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० षटकात ४ बाद २०६ धावा केल्या आहेत. भारत अ संघाला आता विजयासाठी २०७ धावा कराव्या लागणार आहेत.
अफगाणिस्तानकडून सलामीवीर सेदिकुल्ला अटल याने सर्वाधिक ८३ धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर जुबैद अकबरी यानेही ६४ धावांची खेळी केली. करीम जनतने ४१ धावांची चांगली खेळी केली. भारताकडून रसीख सलामने ३ आणि आकिब खानने १ बळी घेतला.
अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. अकबरीने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तर अटलने ३८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
अकबरीने या सामन्यात ४१ चेंडूत ६४ धावांची खेळी केली आणि नंतर तो बाद झाला. अकबरी आणि अटल यांच्यात पहिल्या विकेटसाठी १२ षटकात १३७ धावांची भागीदारी झाली. तर सेदिकुल्लाह अटलने ५२ चेंडूत ८३ धावा केल्या.
भारत अ- प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, नेहल वढेरा, रमणदीप सिंग, निशांत सिंधू, अंशुल कंबोज, राहुल चहर, रसीख दार सलाम, आकिब खान
अफगाणिस्तान अ- सेदीकुल्लाह अटल, झुबैद अकबरी, दरविश रसूली (कर्णधार), मोहम्मद इशाक (विकेटकीपर), करीम जनात, शाहिदुल्ला कमाल, शराफुद्दीन अश्रफ, अब्दुल रहमान, अल्लाह गझनफर, कैस अहमद, बिलाल सामी.
इमर्जिंग आशिया चषक २०२४ मधील पहिला उपांत्य सामना श्रीलंकेने जिंकला. श्रीलंकेच्या विजयासह पाकिस्तानचा संघ उदयोन्मुख आशिया संघातून बाहेर पडला. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान फायनलची वाट पाहणाऱ्या क्रिकेट रसिकांची घोर निराशा झाली आहे.
या सामन्यात श्रीलंका अ संघाने शानदार कामगिरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या पाकिस्तानला श्रीलंकेने २० षटकात १३५ धावाच करू दिल्या. त्यानंतर १६.३ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात १३७ धावा करत सामना जिंकला.
आता भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जो संघ जिंकेल तो, फायनलमध्ये अफगाणिस्तानला भिडेल.
संबंधित बातम्या