AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया १०७ धावांवर गारद, ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया १०७ धावांवर गारद, ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद

AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया १०७ धावांवर गारद, ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद

Oct 31, 2024 11:34 AM IST

भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाच्या सामन्यात 107 धावांत ऑलआऊट झाला. नवदीप सैनी 23 धावांसह सर्वाधिक धावांची कामगिरी करतोय, तर इश्वरन, गायकवाड आणि अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली.

AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया १०७ धावांवर गारद, ऋतुराज गायकवाड शुन्यावर बाद
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया १०७ धावांवर गारद, ऋतुराज गायकवाड शुन्यावर बाद

ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून (३१ ऑक्टोबर) मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफ एरिना येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय सिंह ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर स्वस्तात गारद झाला . 

ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात भारत अ संघाला अवघ्या १०७ धावांत ऑलआऊट केले. भारतीय संघाच्या खराब फलंदाजीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, खालच्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या नवदीप सैनी याने २३ केल्या. तो भारत अ संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. 

तर कर्णधार ऋतुराज गायकवाड, ईशान किशन आणि नितीश रेड्डी यांच्यासारख्या फलंदाजांना १० धावाही करता आल्या नाहीत. ऋतुराज गायकवाड शुन्यावर बाद झाला.

तत्पूर्वी, या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करून ऑस्ट्रेलियात पोहोचलेला अभिमन्यू ईश्वरन पहिल्या कसोटीत अपयशी ठरला. रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळू शकते. अशापरिस्थितीत त्याची निराशाजनक कामगिरीही निवड समितीला निराश करू शकते.

ईश्वरन ३० चेंडूत अवघ्या ७ धावांवर बाद झाला, तर कर्णधार ऋतुराज गायकवाड खातेही उघडू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

त्यानंतर सई सुदर्शनने २१ आणि देवदत्त पडिक्कलने ३६ धावांची खेळी केली, पण त्याला चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठ्या डावात करता आले नाही. इशान किशनने ४, नितीश रेड्डीने शुन्य आणि बाबा इंद्रजीतने ९ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अ संघाकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ब्रेंडन डॉगेट होता, ज्याने ११ षटकांत १५ धावा देत ६ विकेट्स घेतल्या, या ११ षटकांपैकी ५ षटके डॉगेटने निर्धावे टाकली.

Whats_app_banner