मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND W Vs AUS W T20 : भारतासमोर ऑस्ट्रेलिया १४१ धावांवर गारद, तीतस साधूचे ४ विकेट

IND W Vs AUS W T20 : भारतासमोर ऑस्ट्रेलिया १४१ धावांवर गारद, तीतस साधूचे ४ विकेट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 05, 2024 08:35 PM IST

IND W Vs AUS W T20 Scorecard : भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघात आज पहिला टी-20 सामना खेळला जात आहे. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND W Vs AUS W T20 Scorecard
IND W Vs AUS W T20 Scorecard (BCCI Women-X)

India Vs Australia Womens t20 match : भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (५ जानेवारी) मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर सुरू आहे. 

या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाने १९.२ षटकात १४१ धावांवर सर्वबाद झाले. भारताला सामना जिंकण्यासाठी १४२ धावा करायच्या आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तर एलिस पेरीने ३७ धावांचे योगदान दिले. लिचफिल्डने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार लगावले तर एलिस पेरीने २ चौकार आणि २ षटकार मारले. इतर कोणतेही फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत.

भारताकडून तीतस साधूने १७ धावांत सर्वाधिक ४ विकेट घेतले. तर दीप्ती शर्मा आणि श्रेयांका पाटीलने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतले.

दोन्ही प्लेइंग इलेव्ह

भारत-  शेफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तितस साधू.

ऑस्ट्रेलिया- अ‍ॅलिसा हिली (कर्णधार, विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍशलेग गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, मेगन शुट, डार्सी ब्राउन

 

WhatsApp channel