India Vs Australia Womens T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
यानंतर भारताने २० षटकात ८ बाद १३० धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १३१ धावांची गरज आहे. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ, अॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
दीप्तीशिवाय भारताकडून ऋचा घोष झटपट २३ तर स्मृती मानधनाने २५ चेंडूत २३ धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्जने १३ धावांचे योगदान दिले. भारताच्या ५ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता नाही.
भारताने या मैदानावरील पहिला टी-20 सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता टीम इंडियाची नजर दुसरा टी-20 जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेण्याकडे आहे. भारताने यापूर्वी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केले होते.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग, तितास साधू, पूजा वस्त्राकर.
ऑस्ट्रेलिया : अॅलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, किम गर्थ, मेगन शट.