Deepti Sharma ODI Record: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू दीप्ती शर्माने मंगळवारी खास विक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीप्तीने १०० विकेटचा टप्पा गाठला आहे. या कामगिरीसह तिने खास क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. भारतासाठी १०० विकेट घेणारी ती चौथी महिला गोलंदाज ठरली. तिने ८६ व्या सामन्यात ही कामगिरी केली.
दीप्तीपूर्वी भारतासाठी १०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणाचा पराक्रम यांनी नूशीन अल खदीर, नीतू डेव्हिड आणि झुलन गोस्वामी यांनी केला. झूलनने आपल्या कारकिर्दीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५५ विकेट घेतल्या. तर, डेव्हिड आणि खदिरने अनुक्रमे १४१ आणि १०० विकेट घेतल्या आहेत. या खास क्लबमध्ये दीप्ती शर्माने एन्ट्री केली आहे.
मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि मालिकेतील अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील पहिल्यात दोन सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने आधीच मालिका खिशात घातली आहे. तिसरा एकदिवसीय सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जात आहे.
यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, रिचा घोष (विकेटकिपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, मन्नत कश्यप, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंह.
फोबी लिचफिल्ड, अॅलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकिपर), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शट.