मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND W Vs AUS W : आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 रंगणार, सामन्याची वेळ आणि लाईव्ह स्ट्रिमिंग, पाहा संपूर्ण माहिती

IND W Vs AUS W : आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 रंगणार, सामन्याची वेळ आणि लाईव्ह स्ट्रिमिंग, पाहा संपूर्ण माहिती

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 05, 2024 01:10 PM IST

IND W Vs AUS W T20 Live Streaming : यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. याआधी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका गमावली होती.

IND W Vs AUS W T20 Live Streaming
IND W Vs AUS W T20 Live Streaming (PTI)

india w vs australia w t20 series : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये आजपासून (५ जानेवारी) तीन T20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना आज शुक्रवारी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत होणार आहे.

याआधी झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाने ३-० ने धुव्वा उडवला. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. याआधी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका गमावली होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यात (IND W Vs AUS W Head To Head Records) आतापर्यंत ३१ टी-20 सामने झाले आहेत. यातील टीम इंडियाने केवळ ६ सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने २३ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. 

भारतीय मैदानावर या दोन्ही संघ ११ वेळा आमनेसामने आले. यात टीम इंडियाला केवळ एकच विजय मिळवता आला आहे. तर १० सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले.

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 किती वाजता सुरू होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील टी-20 सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल.

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 किती कोणत्या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार?

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका स्पोर्ट्स18 – 1 (SD + HD) आणि स्पोर्ट्स 18 – 2 या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच, भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग जियो सिनेमा अ‍ॅपवर पाहता येईल.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, मन्नत कश्यप, कनिका आहुजा, मिन्नू मनी, सायका इशाक, तीतस साधू.

ऑस्ट्रेलिया: फोबी लिचफिल्ड, अॅलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अ‍ॅशले गार्डनर, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शुट, ग्रेस हॅरिस, हेदर ग्रॅहम, डार्सी ब्राउन, जेस जोनासेन.

WhatsApp channel