IND W vs AUS W 1st T20 Scorecard : भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (५ जानेवारी) मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलियन यांच्यातील दुसरा टी-20 सामना ७ जानेवारीला याच मैदानावर खेळला जाणार आहे.
तत्पूर्वी, या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ १९.२ षटकात १४१ धावांवर सर्वबाद झाला.
प्रत्युत्तरात भारताने १७.४ षटकात १ विकेटच्या मोबदल्यात १४५ धावा करत सामना जिंकला. भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक नाबाद ६४ धावा केल्या. तिने ४४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. स्मृती मानधनाने ५२ चेंडूत ५४ धावा केल्या. मानधना ५४ धावा करून वेरहेमच्या गोलंदाजीवर बाद झाली. जेमिमाह रॉड्रिग्ज ११ चेंडूत ६ धावा करून नाबाद राहिली.
टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तर एलिस पेरीने ३७ धावांचे योगदान दिले. लिचफिल्डने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार लगावले तर एलिस पेरीने २ चौकार आणि २ षटकार मारले. इतर कोणतेही फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत.
भारताकडून तीतस साधूने १७ धावांत सर्वाधिक ४ विकेट घेतले. तर दीप्ती शर्मा आणि श्रेयांका पाटीलने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतले.
भारत- शेफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तितस साधू.
ऑस्ट्रेलिया- अॅलिसा हिली (कर्णधार, विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍशलेग गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, मेगन शुट, डार्सी ब्राउन