मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ZIM : हॉटस्टार-जियो नाही, तर भारत-झिम्बाब्वे मालिका या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार सामने, संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा

IND vs ZIM : हॉटस्टार-जियो नाही, तर भारत-झिम्बाब्वे मालिका या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार सामने, संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा

Jul 02, 2024 01:15 PM IST

India tour of Zimbabwe 2024 : टीम इंडियाला झिम्बाब्वेमध्ये ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका ६ जुलैपासून सुरू होणार आहे. पहिला टी-२० सामना हरारे येथे होणार आहे.

IND vs ZIM : हॉटस्टार-जियो नाही, तर भारत-झिम्बाब्वे मालिका या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार सामने, संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा
IND vs ZIM : हॉटस्टार-जियो नाही, तर भारत-झिम्बाब्वे मालिका या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार सामने, संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा

India vs Zimbabwe live streaming : टी-20 क्रिकेट चॅम्पियन टीम इंडिया ५ दिवसांनी झिम्बाब्वेविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताचा युवा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाला झिम्बाब्वेमध्ये ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका ६ जुलैपासून सुरू होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर शुभमन गिल भारतीय कर्णधार असेल.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला T20 सामना ६ जुलै रोजी होणार आहे. दुसरा T20 सामना ७ जुलै रोजी, तिसरा T20 सामना १० जुलै रोजी, चौथा T20 सामना १३ जुलै रोजी आणि पाचवा आणि अंतिम T20 सामना १४ जुलै रोजी खेळवला जाईल. टी-20 मालिकेतील सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवले जातील.

ट्रेंडिंग न्यूज

भारत-झिम्बाब्वे T20 मालिका लाइव्ह स्ट्रिमिंग

भारत विरुद्ध झिम्बाब्वे T20 मालिका इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रसारित केली जाईल. भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर या मालिकेचा आनंद घेऊ शकतात. सामने सोनी टेन 3 (हिंदी) आणि सोनी टेन 4 (तमिळ/तेलुगु) वर टीव्हीवर थेट प्रक्षेपित केले जातील.

भारत-झिम्बाब्वे T20 मालिकेतील सामन्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंग 'सोनी लिव्ह' ॲपवर उपलब्ध असेल, पण यासाठी तुम्हाला सब्स्क्रिप्शन घ्यावे लागेल.

IPL २०२४ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यात रियान पराग, अभिषेक शर्मा, तुषार देशपांडे, खलील अहमद, ध्रुव जुरेल, आवेश खान, मुकेश कुमार आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे.

नितीशकुमार रेड्डी दुखापतीमुळे बाहेर

आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांचाही या संघात समावेश होता. मात्र, तो आता दुखापतीमुळे झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर आहे. त्याच्या जागी शिवम दुबेचा संघात समावेश करण्यात आला आहे. रेड्डी याला कोणत्या प्रकारची दुखापत झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया - शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अविनाश. खान, खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.

WhatsApp channel