भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना (६ जुलै) हरारे येथे खेळला जात आहे. युवा टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद ११५ धावा केल्या. भारताला विजयाासठी ११६ धावा करायच्या आहेत.
टीम इंडियाने आज अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल आणि रियान पराग यांना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. त्यांचे जवळपास सर्वच फलंदाज फ्लॉप झाले. या सामन्यात क्लाईव्ह मदंडेने २५ चेंडूत सर्वाधिक २९ धावा केल्या. त्याने ४ चौकार मारले. वेस्लीने २१ धावांचे योगदान दिले. बेनेट २३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मेयर्सनेही २३ धावा केल्या. कर्णधार सिकंदर रझा १७ धावा करून बाद झाला.
तर सर्वच भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. रवी बिश्नोईने ४ षटकात केवळ १३ धावा देत ४ बळी घेतले. त्याने २ मेडन षटकेही टाकली. वॉशिंग्टन सुंदरने २ बळी घेतले. त्याने ४ षटकात ११ धावा दिल्या. मुकेश कुमार आणि आवेश खान यांनाही प्रत्येकी १ विकेट मिळाली.
भारत : शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद.
झिम्बाब्वे: तदिवनाशे मारुमणी, इनोसंट कायो, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डायन मेयर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदनाडे (विकेटकीपर), वेस्ली माढवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझरबानी, तेंडाई चटारा.
संबंधित बातम्या