मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ZIM : शुभमन गिलचं अर्धशतक, जैस्वाल-गायकवाडचीही दमदार फलंदाजी, झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर

IND vs ZIM : शुभमन गिलचं अर्धशतक, जैस्वाल-गायकवाडचीही दमदार फलंदाजी, झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर

Jul 10, 2024 06:03 PM IST

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा टी-20 सामना हरारे येथे खेळला जात आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.

शुभमन गिलचं अर्धशतक, जैस्वाल-गायकवाडचीही दमदार फलंदाजी, झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर
शुभमन गिलचं अर्धशतक, जैस्वाल-गायकवाडचीही दमदार फलंदाजी, झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर (AFP)

भारतीय संघ आणि झिम्बाब्वे यांच्यात ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज खेळला जात आहे. हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या स्टेडियमवर भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेला विजयासाठी १८३धावांचे लक्ष्य दिले आहे.

भारताकडून कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक झळकावले. त्याने ४९ चेंडूंचा सामना करताना ६६ धावा केल्या. गिलच्या या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. 

यशस्वी जैस्वाल शुभमन गिलच्या साथीने सलामी आला. गिलने कर्णधारपदाची खेळी खेळताना ४९ चेंडूत ६६ धावा केल्या. तर यशस्वीने झटपट ३६ धावा केल्या.

ट्रेंडिंग न्यूज

ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक हुकले. त्याने २८ चेंडूत ४९ धावा केल्या. गायकवाडच्या या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. यशस्वी जैस्वाल ३६ धावा करून बाद झाला. संजू सॅमसन १२ धावा करून नाबाद राहिला.

त्याआधी गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले, त्याने १० धावा केल्या.

झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना कर्णधार सिकंदर रझाने ४ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले. ब्लेसिंग मुझरबानीने ४ षटकात २५ धावा देत २ बळी घेतले. या दोघांशिवाय अन्य कोणताही गोलंदाज यशस्वी होऊ शकला नाही. वेलिंग्टनने ३ षटकात २५ धावा दिल्या.

दरम्यान, मालिकेतील पहिला सामना १३ धावांनी जिंकून झिम्बाब्वेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. पण भारतीय संघाने दुसरा सामना १०० धावांनी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

झिम्बाब्वेची कमान सिकंदर रझा यांच्या हाती आहे. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला हा तिसरा सामना जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याची इच्छा आहे.

WhatsApp channel