मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ZIM : अभिषेक-रियान परागची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री, छाप पाडण्यासाठी मिळणार केवळ २ सामने?

IND vs ZIM : अभिषेक-रियान परागची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री, छाप पाडण्यासाठी मिळणार केवळ २ सामने?

Jul 06, 2024 04:48 PM IST

अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांनी आयपीएल २०२४ मध्ये आपापल्या संघांसाठी चमकदार कामगिरी केली होती.

IND vs ZIM : अभिषेक-रियान परागची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री, छाप पाडण्यासाठी मिळणार केवळ २ सामने
IND vs ZIM : अभिषेक-रियान परागची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री, छाप पाडण्यासाठी मिळणार केवळ २ सामने

भारत आणि झिम्बाब्वे टी-20 मालिकेतील पहिला सामना आज(६ जुलै) हरारे येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांना आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली आहे. यापैकी अभिषेक आणि रियन पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत, तर ज्युरेलने यापूर्वीच कसोटी पदार्पण केले आहे.

अभिषेकच्या पदार्पणाची माहिती कॅप्टन शुभमन गिलने आधीच दिली होती. अभिषेक शर्मा त्याच्यासोबत सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी घेणार असल्याचे गिलने सांगितले होते. सामना सुरू होण्यापूर्वी रियान पराग आणि ध्रुव जुरेलचे टी-20 पदार्पणही झाले आहे.

अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांनी आयपीएल २०२४ मध्ये आपापल्या संघांसाठी चमकदार कामगिरी केली होती. एकीकडे अभिषेकने सनरायझर्स हैदराबादसाठी १६ सामन्यात २०४ च्या तुफानी स्ट्राईक रेटने ४८४ धावा केल्या होत्या. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रियान पराग हा मोसमात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू होता. परागने आरआरसाठी १५ सामन्यांमध्ये ५२ च्या उत्कृष्ट सरासरीने ५७३ धावा केल्या होत्या. तर ध्रुव जुरेलने यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

छाप पाडण्यासाठी फक्त २ सामने?

पदार्पण संस्मरणीय बनवण्यासाठी या तिन्ही खेळाडूंच्या नजरा असतील. शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन तिसऱ्या सामन्यातून पुन्हा संघात सामील होऊ शकतात, त्यानंतर टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन कॉम्बिनेशन बदलले जाऊ शकते. अशा स्थितीत अभिषेक, ध्रुव आणि रायन यांना पहिल्या २ सामन्यात दमदार कामगिरी करून भारतीय संघात आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचावा लागेल. जर हे तीन नवोदित खेळाडू पहिल्या २ सामन्यात चांगली कामगिरी करू शकले नाहीत, तर त्यांना पुढील संधीसाठी खूप वेळ वाट पाहावी लागेल.

WhatsApp channel