टी-20 विश्वचषक चॅम्पियन भारतीय संघ ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. आज (६ जुलै) हरारे येथे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला टी-20 सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ४:३० वाजता सुरू होईल. पाच सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने हरारे येथेच खेळवले जातील.
विशेष म्हणजे, भारताचा युवा संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. टी-20 विश्वचषक २०२४ नंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
आतापर्यंत हरारेमध्ये ५० टी-20I सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २९ वेळा सामना जिंकला असून लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने २० वेळा सामना जिंकला आहे. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५२ आहे. एकदा येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्वाधिक २२९ धावा केल्या होत्या.
हरारेच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या १३० आहे. दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या १९४ आहे. येथे २०० धावांचाही पाठलाग केला जाऊ शकतो. हरारे स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही उपयुक्त ठरली आहे. सामन्यात प्रथम वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. इथे दुसऱ्या डावात खेळपट्टी फारशी बदलत नाही. तथापि, फिरकीपटूंना टर्न दिसू शकतो.
दरम्यान, भारत असो की झिम्बाब्वे, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विकेटकीपर- जितेश शर्मा
फलंदाज- रिंकू सिंग, शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रियान पराग
अष्टपैलू- सिकंदर रझा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा
गोलंदाज- रवी बिश्नोई, आवेश खान, तेंडाई चटारा, वेलिंग्टन मसकडझा
शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, खलील अहमद, हर्षित राणा, रवी बिश्नोई.
तादिवानाशे मारुमणी, मिल्टन शुम्बा, इनोसंट कैया, वेस्ली मढेवेरे, सिकंदर रझा (कर्णधार), ल्यूक जोंगवे, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसकडझा, ब्लेसिंग मुझरबानी, रिचर्ड नगारावा, तेंडाई चटारा.
संबंधित बातम्या