मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind Vs Zim : शतक करूनही अभिषेक शर्माला बाहेर बसावं लागणार? जैस्वाल कोणाच्या जागी खेळणार? वाचा

Ind Vs Zim : शतक करूनही अभिषेक शर्माला बाहेर बसावं लागणार? जैस्वाल कोणाच्या जागी खेळणार? वाचा

Jul 08, 2024 06:01 PM IST

शतक केल्यानंतर आणि सामना जिंकल्यानंतरही संघात बदल होण्याची शक्यता आहे. अभिषेक किंवा गिल या दोघांपैकी एकाला बलिदान द्यावे लागण्याची शक्यता आहे. गिल कॅप्टन असल्याने अभिषेक शर्मा पुढच्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो.

Ind Vs Zim 3rd t20 शतक करूनही अभिषेक शर्माला बाहेर बसावं लागणार? जैस्वाल कोणाच्या जागी खेळणार? वाचा
Ind Vs Zim 3rd t20 शतक करूनही अभिषेक शर्माला बाहेर बसावं लागणार? जैस्वाल कोणाच्या जागी खेळणार? वाचा (ANI and AFP Images)

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दोन सामने झाले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. मालिकेत टीम इंडिया युवा खेळाडूंसह उतरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात अभिषेक शर्मा शुन्यावर बाद झाला, पण दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावून त्याची भरपाई केली. परंतु १० जुलै रोजी होणाऱ्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून तो बाहेर पडण्याची शक्यता आहे.

होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. वास्तविक, शुभमन गिलने त्याच्या नेतृत्वात रविवारी (७ जुलै) परदेश दौऱ्यावर पहिला विजय नोंदवला. या विजयाचे श्रेय गिलने अभिषेक शर्माला आणि ऋतुराज गायकवाडला दिले. अभिषेकच्या जलद शतकानंतर, गायकवाडने ७७ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यामुळे भारताला २० षटकांत २३४ अशी मोठी धावसंख्या उभारता आली. शुभमनने अभिषेक आणि गायकवाड यांचे कौतुक केले.

पण शतक केल्यानंतर आणि सामना जिंकल्यानंतरही संघात बदल होण्याची शक्यता आहे. अभिषेक किंवा गिल या दोघांपैकी एकाला बलिदान द्यावे लागण्याची शक्यता आहे. गिल कॅप्टन असल्याने अभिषेक शर्मा पुढच्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो.

या मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघात पॉवर हिटर संजू सॅमसनच्या आगमनाने भारताला बळकटी मिळणार आहे. ICC T20 विश्वचषक २०२४ चे विजेते सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे पुढील सामने खेळतील.

अशा स्थितीत वर्ल्डकपमध्ये बेंचवर बसलेल्या यशस्वी जैस्वालचा प्लेइंग-११ मध्ये समावेश झाला तर अभिषेक शर्माला बलिदान द्यावे लागेल. तसेच, ध्रुव जुरेलच्या जागी संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतो.

WhatsApp channel