भारताचा युवा क्रिकेट संघ सध्या ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. मालिकेतील दोन सामने खेळले गेले असून, मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आता तिसरा सामना उद्या बुधवारी (१० जुलै) हरारे येथे होणार आहे.
आजच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसू शकतात. जैस्वालच्या पुनरागमनानंतर अभिषेक शर्मालाजी जागा धोक्यात आली आहे. गेल्या सामन्यात शतक करणारा अभिषेक शर्मा या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग असतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, भारत असो की झिम्बाब्वे, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विकेटकीपर- संजू सॅमसन
फलंदाज- रिंकू सिंग, शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रियान पराग
अष्टपैलू- सिकंदर रझा (उपकर्णधार), शिवम दुबे
गोलंदाज- रवी बिश्नोई, मुकेश कुमार, तेंडाई चटारा, वेलिंग्टन मसकडझा
भारत वि. झिम्बाब्वे पीच रिपोर्ट
आतापर्यंत हरारेमध्ये ५२ टी-20I सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३१ वेळा सामना जिंकला असून लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने २० वेळा सामना जिंकला आहे. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५२ आहे. एकदा येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्वाधिक २२९ धावा केल्या होत्या.
हरारेच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या १३० आहे. दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या १९४ आहे. येथे २०० धावांचाही पाठलाग केला जाऊ शकतो. हरारे स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही उपयुक्त ठरली आहे. सामन्यात प्रथम वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. इथे दुसऱ्या डावात खेळपट्टी फारशी बदलत नाही. तथापि, फिरकीपटूंना टर्न दिसू शकतो.
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, रवी बिश्नोई.
तादिवानाशे मारुमणी, मिल्टन शुम्बा, इनोसंट कैया, वेस्ली मढेवेरे, सिकंदर रझा (कर्णधार), ल्यूक जोंगवे, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसकडझा, ब्लेसिंग मुझरबानी, रिचर्ड नगारावा, तेंडाई चटारा.
संबंधित बातम्या