मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ZIM 2nd T20 : या ३ चुका सुधारा आणि सामना जिंका, शुभमन गिलचा संघ आज झिम्बाब्वेला भिडणार

IND vs ZIM 2nd T20 : या ३ चुका सुधारा आणि सामना जिंका, शुभमन गिलचा संघ आज झिम्बाब्वेला भिडणार

Jul 07, 2024 11:17 AM IST

टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा झिम्बाब्वेकडून पराभव झाला होता. पण आता आज भारताला बदला घेण्याची संधी आहे.

IND vs ZIM 2nd T20 : या ३ चुका सुधारा आणि सामना जिंका, शुभमन गिलचा संघ आज झिम्बाब्वेला भिडणार
IND vs ZIM 2nd T20 : या ३ चुका सुधारा आणि सामना जिंका, शुभमन गिलचा संघ आज झिम्बाब्वेला भिडणार (AFP)

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका खेळली जात आहे. ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शनिवारी (६ जुलै) हरारे येथे झाला. या सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा १३ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडिया पिछाडीवर पडली आहे.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची फलंदाजी खराब झाली. हरारे येथे प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने ११५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ १०२ धावांवर गडगडला. टीम इंडियाने आपल्या तीन चुका सुधारल्या नाहीत तर दुसऱ्या टी-20 सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागू शकते. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा सामना आज रविवारी (७ जुलै) होणार आहे.

सलामीवीरांना चांगली सुरुवात करावी लागेल

सर्वप्रथम भारतीय सलामीवीरांना चांगली सुरुवात करावी लागेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला होता. गिल यांच्यासोबत ते ओपनिंगसाठी आला होता. त्यानंतर गिलही ३१ धावा करून बाद झाला. या सामन्यात तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. दुसऱ्या सामन्यात भारताला चांगली सुरुवात झाली नाही तर पुन्हा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

मिडल ऑर्डरलाही कमाल करावी लागणार

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरलाही कमाल करावी लागणार आहे. भारतीय संघाची मधली फळी पुन्हा फ्लॉप झाली तर सामना जिंकणे कठीण होईल. पहिल्या सामन्यात रिंकू सिंग ५व्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. तो शून्यावर बाद झाला. तर रियान पराग २ धावा करून बाद झाला. ध्रुव जुरेलही अवघ्या ६ धावा करून बाद झाला. भारतीय संघाला फलंदाजीवर कसरत करावी लागणार आहे.

क्षेत्ररक्षण-गोलंदाजीवर भर द्यावा लागणार

टीम इंडियाला क्षेत्ररक्षणाबरोबरच गोलंदाजीवरही भर द्यावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने ९० धावांवर ९ विकेट गमावल्या होत्या. मात्र यानंतर भारतीय गोलंदाजांना शेवटची जोडी बाद करता आली नाही. त्यामुळे जवळपास २५ धावा अधिक झाल्या. या २५ धावा टीम इंडियासाठी महागड्या ठरल्या आणि पराभवाचे कारण ठरल्या. त्यामुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार गिलला फलंदाजी, गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

WhatsApp channel