भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेतील विजयाने केली. यानंतर वनडे मालिकाही जिंकली. मात्र हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-२० मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
टी-20 मालिका गमावल्यानंतर चाहते संतापले आहेत, त्यांनी हार्दिकला कर्णधारपदावरुन दूर करावे, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी हार्दिक हा भारताचा भावी कर्णधार होऊ शकत नाही, असेही काही लोक म्हणाले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना फ्लोरिडामध्ये खेळला गेला, ज्यामध्ये हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात अपयशी ठरला. प्रथम फलंदाजी करताना हार्दिकने १८ चेंडूत १ षटकाराच्या मदतीने केवळ १४ धावा केल्या. यानंतर त्याने ३ षटकात गोलंदाजी केली ज्यात त्याने ३२ धावा खर्च केल्या आणि त्याला विकेटही मिळाले नाही.
हार्दिकला सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. टी-20 मालिकेच्या सुरुवातीपासूनच हार्दिक टार्गेटवर आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते. यानंतर भारताने पुढील दोन सामने जिंकले, मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ निर्णायक सामना जिंकू शकला नाही. या पराभवानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
हार्दिक पांड्यानेही फलंदाजी अतिशय संथ केली. त्याने १८ चेंडू खेळले, ज्यावर केवळ १४ धावा झाल्या. टी-20 फॉरमॅटमध्ये ही अतिशय संथ खेळी आहे. त्यावर जोरदार टीकाही झाली. यानंतर पांड्याने गोलंदाजीतही पहिले षटक केले. त्यात भरपूर धावा दिल्या.
गेल्या सामन्यातही पांड्याने कॅप्टन्सीत चुका केल्या होत्या. त्याने अक्षरला पहिल्या १३ षटकात गोलंदाजी दिली नाही. तर मुकेश कुमारलाही एकच षटक दिले. त्याला कुलदीप आणि चहलचाही योग्य वापर करता आला नाही. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने पहिले षटक फिरकी गोलंदाज अकिल हुसेनला दिले. त्याने यशस्वी आणि गिलला लवकर बाद केले.
संबंधित बातम्या