टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय संघ आज (१२ जून) अमेरिकेविरुद्ध तिसरा साखळी सामना खेळणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणारा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल, तर न्यूयॉर्कच्या स्थानिक वेळेनुसार, सामना सकाळी १०.३० वाजता सुरू होईल.
मागील दोन सामने जिंकणारी टीम इंडिया या सामन्यात काही मोठे बदल करू शकते. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी संघाबाहेर जाऊ शकतात.
याआधी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा पूर्णपणे फ्लॉप दिसले. पाकिस्तानविरुद्ध दुबे केवळ ३ धावा करून बाद झाला, तर रवींद्र जडेजा शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याला गोलंदाजीतही यश मिळाले नाही.
अशा परिस्थितीत रोहित शर्मा अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात दोन्ही खेळाडूंना बेंचवर बसवू शकतो. दुबेच्या जागी संजू सॅमसनला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवता येईल. याशिवाय जडेजाच्या जागी कुलदीप यादवचा मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून संघात समावेश केला जाऊ शकतो.
आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली रोहित शर्मासोबत ओपनिंगला दिसला आहे. अमेरिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही विराट कोहली रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसू शकतो. अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वालला टी-20 विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
अमेरिका : स्टीव्ह टेलर, मोनांक पटेल (कर्णधार), अॅरॉन जोन्स, नितीशकुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नोस्तुश केंजिगे, सौरभ नेत्रावळकर, अली खान.
संबंधित बातम्या