टी-20 विश्वचषक २०२४ चा २५ वा सामना बुधवारी (१२ जून) भारत आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. उभय संघांमध्ये होणारा हा सामना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा दोन संघांमध्ये सामना खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना खूपच रोमांचक होईल, अशी आशा आहे.
वास्तविक, टीम इंडिया आपले पहिले दोन सामने जिंकून येत आहे. तर अमेरिकन संघानेही पहिले दोन सामने जिंकले आहेत. या सामन्यासाठी टीम इंडिया फेव्हरिट मानली जात असली तरी टीम इंडिया त्यांना हलक्यात घेण्याचा प्रयत्न करणार नाही.
ची-20 विश्वचषक २०२४ मध्ये USA विरुद्ध भारत सामना बुधवारी (१२ जून) होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.
टी-20 विश्वचषक २०२४ मधील यूएसए विरुद्ध भारत सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
टी-20 विश्वचषक २०२४ चे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग Disney+Hotstar वर उपलब्ध असेल. तुम्ही Disney+Hotstar वर हा सामना विनामूल्य पाहू शकता.
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाचा आतापर्यंतचा प्रवास खूपच नेत्रदीपक राहिला आहे. टीम इंडियाने पहिला सामना जिंकला होता. या सामन्यात भारताने आयर्लंडचा ८ विकेटने धुव्वा उडवला होता. यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धचा दुसरा सामना ६ धावांनी जिंकला. टीम इंडिया सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर अमेरिकन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर ८ साठी पात्र ठरेल.
संबंधित बातम्या