भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी झाला. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना अतिशय रोमांचक झाला. सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंगने प्रत्येकी २ विकेट घेत आधी सामना टाय केला, त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने शानदार पद्धतीने विजय मिळवला. यामुळे भारतीय संघाने श्रीलंकेला ३-० ने धूळ चारली.
भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना ४३ धावांनी जिंकला होता. यानंतर भारताने दुसरा सामना ७ विकेटने जिंकून मालिकेवर कब्जा केला. आता तिसरा सामनाही जिंकून त्यांनी क्लीन स्वीप केला आहे.
तिसऱ्या सामन्याच्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाला ३ धावांचे लक्ष्य मिळाले. महिष तिक्षीनाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सूर्याने सामना जिंकला.
पहिला चेंडू: वाइड
दुसरा चेंडू: कुसल मेंडिसने १ धाव घेतली
तिसरा चेंडू : कुसल परेरा झेलबाद.
चौथा चेंडू: कुसल मेंडिस झेलबाद.
या मालिकेतील शेवटचा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना १३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघानेही ८ गडी गमावून १३७ धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. संघाकडून कुसल परेराने ४६ आणि कुसल मेंडिसने ४३ धावा केल्या.
तर पथुम निसांकाने २६ धावा केल्या. याशिवाय बाकीचे फलंदाज नुसतेच येत-जात होते.
विशेष म्हणजे रिंकू सिंगने भारतीय संघासाठी १९ वे षटक टाकले, ज्यात त्याने २ बळी घेतले. श्रीलंकेला १२ षटकात १० धावा करायच्या होत्या. त्यानंतर शेवटच्या षटकात श्रीलंकेला ६ धावांची गरज असताना सूर्या स्वतः गोलंदाजीसाठी आला. त्याने २ बळी घेत या षटकात केवळ ५ धावा दिल्या आणि हातातून गेलेला सामना बरोबरीत सोडवला.
त्याआधी भारताने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १३८ धावा केल्या होत्या. भारताकडून शुभमन गिलने ३९, रियान परागने २६ आणि वॉशिंग्टन सुंदरने २५ धावा केल्या.
संबंधित बातम्या